भारतीय वेटलिफ्टींग फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल संतोष सिंहासने यांचा सत्कार सिंहासने यांच्या निवडीने सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा – प्रतिकदादा पाटील
महासंघाच्या उपाध्यक्षपदी विराजमान होण्याचा सांगलीला प्रथमच मान मिळाला त्यानिमीत्ताने संतोष सिंहासने यांचा सत्कार माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील व उपमहापौर उमेश पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील यांनी सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्यें वेटलिफ्टींग खेळाचे महापौर चषक स्पर्धा बद्दल लवकरच चर्चा करुन निर्णय घेवू असे आश्वासन दिले.
श्री. सिंहासने यांनी महाराष्ट्रं राज्याच्या उपाध्यक्षपदी अत्यंत चांगले काम केले आहे. तसेच ते राष्ट्रीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय श्रेणी एकचे पंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक खेळाडू घडविले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमास संतोष वंजाळे, अमोल नवले, राजू यादव, राजेंद्रप्रसाद जगदाळे, विपूल गांधी, अतुल खोत, नितीन बेदमुथा, राहुल मोरे, अजित ढोले, पैगंबर शेख, विश्वानाथ घुळी, दत्तात्रय शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.