सांगलीतील बाळू लोखंडे यांच्या खूर्चीची डायरेक्ट इंग्लंडमध्ये हवा!
तासगाव : आतापर्यंत आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या खुर्चीच्या खुमासदार अशा चर्चा अनेकदा ऐकल्या. परंतू दोन दिवसांपासून अखंड भारतात आणि खासकरुन महाराष्ट्रात मात्र चर्चा सुरु आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज या गावातील बाळू लोखंडे या मंडप व्यवसायिकाच्या एका लोखंडी खुर्चीची.
ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टॉरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं नावं लिहलेलं आहे.
व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट आणि
सुनंदन लेले यांनी ” बाळू लोखंडे सावळज ” असं लिहलेल्या लोखंडी खुर्चीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.