भाजप मंत्र्यांच अजब विधान म्हणाले,'भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हिंदुस्थानी मुसलमानांचे पूर्वज'
मुंबई : उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी एक पत्रकार परिषद दरम्यान भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हिंदुस्थानी मुसलमानांचे पूर्वज आहेत, त्यामुळे त्यांनी हिंदुस्थानची भूमि आणि संस्कृतीला नमन करायला हवे. असे विधान केले आहे.
ते पुढे म्हणाले,'आपल्या देशातील मुसलमानांनी काबाला (मक्का मदीना) जाण्याची आवश्यकता नाह. कारण हिंदुस्थानमधील मुसलमानांचे पूर्वज भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव आहेत. त्यामुळे येथील मुसलमानांनी हिंदुस्थानची भूमि आणि संस्कृतीपुढे नतमस्तक व्हावे.असेही ते म्हणाले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशलवरही त्यांच्या या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे.
तत्पूर्वी, हिंदु आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते तसेच देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.