Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथील आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी...

सांगली येथील आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी...


पंडित दीनदयाळ यांचे विचार सर्व मानवजातीला तारक :- आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली २५ सप्टेंबर : सांगली येथे “पर्यावरणातील बदलामुळे आज सर्व जगावर विविध संकटे येत आहेत. महापूर, अतिवृष्टी जंगलांना आग लागणे, तापमानात वाढ या गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हासामुळे घडत आहेत. यासाठी पर्यावरण पूरक भारतीय जीवनपद्धती हि जगाला उपकारक ठरणार आहे. असे जगणे कसे असावे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या विचारांमधून सतत सांगितले आहे.त्यामुळे पंडित दीनदयाळ यांचे विचार संचित सर्व जगाला मार्गदर्शक ठरणार आहे”. असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पंडितजींच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले.

“गायीचे दुध काढणे हे योग्य आहे. पण गोचडी होऊन रक्त पिणे हे गायीचा नाश करणारे आहे. त्याप्रमाणे निसर्गाचा वापर गरजेपुरता करणे. हे विसरून सर्व जग निसर्गाचा विनाश करीत आहे. पर्यावरणाचा समतोल ढळल्याने काय घडते आहे, ते सर्व जग सहन करीत आहे.” असेही आमदार गाडगीळ म्हणाले.

याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य शेखर इनामदार, संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अशरफ वांकर, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संजय कुलकर्णी, संदीप आवटी, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजिंक्य हंबर, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.