Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोंदणी, परवाना न घेतलेल्या अन्न व्यवसायिकांनी विशेष मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज सादर करावा-सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले नोंदणी / परवाना न घेतलेल्या व्यवसायिकांवर कडक कारवाई करणार

नोंदणी, परवाना न घेतलेल्या अन्न व्यवसायिकांनी  विशेष मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज सादर करावा-सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले नोंदणी / परवाना  न घेतलेल्या व्यवसायिकांवर  कडक कारवाई करणार


सांगली, दि. 29,  : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तरतुदीनुसार अन्न पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी नोंदणी / परवाना घेणे बंधनकारक आहे.  नोंदणी / परवाना न घेतलेल्या अन्न व्यवसायिकांसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तरी अन्न व्यवसायिकांनी FOSCOS (www.foscos.fssai.gov.in) या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदणी / परवाना अर्ज सादर करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

नोंदणी / परवाना अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत. FOSCOS (www.foscos.fssai.gov.in)......click here for Foscos…..How to apply/Eligibility Criteria & fee structure/Documents required……Sign up …..Create login id password…..login Business…..Aply for license or Registration. ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना परवाना घेणे आवश्यक आहे. अन्न परवाना वार्षिक फी किरकोळ/घाउक विक्रेता/हॉटेल 2 हजार रूपये, छोटे उत्पादक 3 हजार रूपये व मोठे उत्पादक 5 हजार रूपये अशी आहे. तसेच ज्यांची उलाढाल 12 लाखापेक्षा कमी आहे त्यासाठी वार्षिक फी 100 रूपये इतकी आहे.

ज्या अन्न व्यवसायिकांना नोंदणी / परवाना साठी स्वत: अर्ज करणे शक्य नाही त्यांनी सेतू कार्यालय / महाईसेवा केंद्र/सीएससी यांची मदत घेवून अर्ज सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी 0233-2602202/2602201 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सप्ताह संपल्यानंतर विना नोंदणी / परवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांच्याकडे तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे नोंदणी / परवाना नसल्याचे आढळून येईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.