Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp, कंपनीची मोठी घोषणा..

 या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp, कंपनीची मोठी घोषणा..


नवी दिल्ली, : जगभरात WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. पण आता काही स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार आहे. कंपनी जुन्या Android फोन्समधून WhatsApp Support हटवणार आहे. WhatsApp खरंतर अनेक Android Version ला सपोर्ट करतं, परंतु आता कंपनी अँड्रॉईडचं किमान वर्जन वाढवणार आहे. आतापर्यंत WhatsApp कमीत-कमी Android 4.0 वर्जनवर चालवता येत होतं. परंतु आता कंपनीने आपली वेबसाइट अपडेट केली आहे, त्यात WhatsApp आता कमीत-कमी Android 4.1 वर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोन्सवरच सपोर्ट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी WhatsApp ने 1 नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन ठेवली आहे.

या तारखेनंतर या जुन्या डिव्हाईसवर युजर्स WhatsApp चा वापर करू शकणार नाहीत.

काय आहे कंपनीचं म्हणणं? अधिकृत WhatsApp सपोर्ट पेजवर कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. WhatsApp आता Android 4.1 आणि त्याहून नव्या वर्जनला सपोर्ट करेल. याचा अर्थ WhatsApp अशा Android Phone वर काम करेल, जे 2013 नंतर जारी केले गेले आहेत.


ज्यांच्याकडे जुने स्मार्टफोन्स आहेत, त्यांना नोव्हेंबरनंतर अपडेट मिळणार नाही. WhatsApp असं करणारा पहिलाच डेव्हलपर नाही. याआधीही अनेक डेव्हलपर्सनी Android च्या जुन्या वर्जनसाठी सपोर्ट बंद केलं आहे. जुने स्मार्टफोन्स असल्यास काय कराल? जर तुमच्याकडे 2013 किंवा त्यानंतरचा स्मार्टफोन असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे LG Optimus L3, Samsung Galaxy SII, Galaxy Core, ZTE Grand S Flex आणि Huawei Ascend G740 सारखे अतिशय जुने स्मार्टफोन असतील, तर त्या फोनला WhatsApp Update मिळणार नाही. WhatsApp आता 1 नोव्हेंबरपासून OS 4.0.4 आणि जुन्या OS वर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला सपोर्ट करणार नाही. जुना फोन असल्यास युजर्सनी नव्या डिव्हाईसवर स्विच करा किंवा तुमची चॅट हिस्ट्री सेव्ह करा.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.