नवाब मलिक; राज्यपाल कोश्यारींचे भवन हा राजकीय अड्डा..
भाजप व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालांवर निशाणा साधण्यात आला आहे. राजभवन हे भाजपचे कार्यालयच असल्याची टीका यापूर्वीही करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल व भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीवरून राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भवन आता तर राजकीय अड्डाच झालेला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी ट्विट करून राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे भाजपचेच नेते असल्याचे म्हंटले. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशी माहिती मिळाली आहे. मात्र, वारंवार कार्यकर्ते भेटत आहेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी भाजपचे असल्याचे दिसत असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.