अमित ठाकरेंचा शिवसेनेवर जोरदार हल्ला म्हणाले.
मुंबई : रस्त्यावरील खड्ड्यांवरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रथमच महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई शहरासह राज्यभरातील अनेक शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून हा मुद्धा पुन्हा एकदा समोर आला आहे. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल. असा टोला अमित ठाकरे यांनी लगावला आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल. अशी फेसबुस पोस्ट आज अमित ठाकरे यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.