सांगली महापालिकेकडे आठ महिन्यात झाली 460 लग्नाची नोंद : नव दाम्पत्यानी विवाह नोंदणी करावी: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
सांगली महापालिकेकडे आठ महिन्यात झाली 460 लग्नाची नोंद झाली आहे. महापालिकेडून प्रस्ताव दाखल होताच सुलभतेने मॅरेज सर्टिफिकेट दिले जात आहेत. विवाह नोंदणीकडे नागरिकांचा वाढता कल पाहता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह नोंदणी कार्यालय अधिक गतिमान झाले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात विवाह झालेल्या दाम्पत्याना महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी विवाह दाखल्याचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर मनपा विवाह नोंदणी कार्यालयाकडून लग्नाचा पुरावा, वधू वर, तीन साक्षीदार आणि विवाह लावून देणारे धर्मगुरू किंवा भटजी यांच्यासह प्रस्तावधारकाला बोलावून सहायक आयुक्तांच्या समोर पडताळणी केली जाते आणि तात्काळ विवाह प्रमाणपत्र देण्याची सोय आहे. यासाठी महापालिकेच्या प्रभाग 1 आणि 2 साठी प्रभाग समिती 2 कार्यालय, विश्रामबाग गणपती मंदिराच्या पिछाडीस, प्रभाग 3 साठी कुपवाड विभागीय कार्यालय तर मिरज प्रभाग 4 साठी मिरज महापालिका विभागीय कार्यालय या ठिकाणी विवाह नोंदणीची व्यवस्था केली आहे. जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या आठ महिन्याच्या काळात महापालिकेच्या प्रभाग 1 आणि 2 च्या कार्यक्षेत्रात 278, कुपवाङमध्ये 72 आणि मिरजेमध्ये 110 अशा एकूण 460 विवाहाची नोंद करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्वच कार्यालयात सुलभतेने आणि कमीत कमी वेळेत विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात आहे. याचा नव दाम्पत्यानी लाभ घेऊन आपल्या विवाहाची नोंद महापालिकेकडे करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.