कलाकार मानधनाचे प्रस्ताव 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करा
सांगली, दि. 30, : सन 2021-22 या वर्षाकरिता कलाकार मानधनाचे प्रस्ताव इच्छुक पात्र कलाकारांनी दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पंचायत समिती मार्फत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली कडे पाठवावेत. तद्नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
प्रस्तावासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेबाबत वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक), उत्पनाचा तहसिलदार यांचा दाखला (48 हजार रूपये पर्यंत), आकाशवाणी, राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील प्रमाणपत्रे, कले संबंधित सर्व पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स, रहिवाशी दाखला, 100 रूपयांच्या स्टँपवर नोटरी, कलाकाराचे आधार लिंक केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स (वैयक्तिक खाते), दुरध्वनी क्रमांक व आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पाठवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.