भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन: 29 सप्टेंबर ते 2 आक्टोबर 2021 या कालावधीत विविध कार्यक्रम: नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन
सांगली: भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज ,कुपवाड शहर महानगरपालिकेकडून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठीही नागरिकांच्या सहभागातून अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमामध्ये मनपा क्षेत्रातील सामाजिक संस्था, रहिवाशी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, रहिवाशी सोसायटी, मनपाचे सफाईमित्र व स्वच्छता गृही तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी 29 सप्टेंबर 2021 सकाळी 6 ते दु 2 पर्यंत ओला आणि सुका कचरा विलगीकरण जनजागृती अभियान सर्व प्रभाग समिती कार्यालयापासून सुरू होणार आहे. या प्रबोधन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्षा चव्हाण यांच्याशी 7030000239 या क्रमांकावर संपर्क साधावा.
1 आक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 3 वाजता भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा होणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्था, रहिवाशी संस्था, सोसायटी, मनपाचे सफाईमित्र व स्वच्छता गृही यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने घेणेत आलेल्या पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे. यासह त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रबोधनपर विषयावर आधारित प्रदर्शने सुद्धा आयोजित करण्यात आली आहेत. हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सकाळी 10 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत. तसेच त्याच ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य संग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना /नवे संकल्प, स्वच्छ भारत अभियानात योगदान आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे भव्य प्रदर्शनही आयोजित केले आहे. या प्रदर्शनात ज्यांना आपल्या संस्था किंवा सामाजिक उपक्रमाचे स्टोल लावायचे आहेत त्यांनी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे यांच्या 9822185944 या नंबरवर संपर्क साधावा. या स्टोलमधून सुद्धा उत्कृष्ट स्टोलला पारितोषिक दिले जाणार आहे.
याचबरोबर 2 आक्टोबर रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले असून 2 आक्टोबर सकाळी 10:30 वाजता महापालिका मुख्यालय सांगली येथून हरिपूर गावातील वसंतदादा पाटील स्फूर्तीस्थळ या ठिकाणापर्यंत हा हेरिटेज वॉक असणार आहे.
29 सप्टेंबर 2021 ते 2 आक्टोबर 2021 या कालावधीत होत असणाऱ्या सर्व कार्यक्रमात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, गटनेते विनायक सिंहासने, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वानी शासनाच्या कोव्हिड 19 च्या नियमांचे पालन करून करने बंधनकारक असणार आहे तसेच सर्वानी नियमांचे पालन करावे असेही आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.