डॉ. अदिन बाळासाहेब चोपडे यांच्याकडून सभेच्या " जीवन संजीवनी फंडा " साठी रुपये 1 लाखाचे बृहत्दान..
सांगली : येथील डॉ. अदिन बाळासाहेब चोपडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दक्षिण भारत जैन सभेच्या ‘गुरूदेव समंतभद्र जीवन संजीवनी फंडा’स उत्स्फूर्तपणे रु.1 लाखाचे बृहत्दान दिले. सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि.पाटील यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी देणगीबद्दल आणि वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. अदिन यांचा सन्मान करून पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ.अदिन यांनी एम.बी.बी.एस., एम.एस्. मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमन सायन्स येथून तर राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमन सायन्समधून एम.सी.एच्. युरोलॉजी ( दावणगिरी ) येथून यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
श्री. रावसाहेब जि.पाटील यांनी या योजनेविषयी माहिती दिली. समाजातील अत्यंत गरीब गरजू रूग्णांसाठी सभेने हा फण्ड सुरू केलेला असून कोरोना काळात या फण्डाचे महत्त्व ओळखून हा फंड 1 कोटी रुपयांचा करण्याचा सभेचा मानस अाहे. सासाठी समाजातील दातारांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.अजित पाटील यांनी चोपडे कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना कीर्तनसम्राट तात्यासाहेब चोपडे यांच्या पासून आताची ही चौथी पिढी सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे सांगून सभेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. अदिन यांचे वडिल सभेच्या कर्मवीर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बाळासाहेब चोपडे, सौ. सुवर्णा बाळासाहेब चोपडे, कन्या सौ. जुई ओंकार पाटील, विभागीय ट्रस्टी पोपटलाल डोर्ले, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पाटील (मजलेकर), विभागीय महामंत्री शांतिनाथ नंदगावे, महिला महामंत्री सौ. भारती चौधरी, प्रमोद उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.