पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट परिसरात स्थानिक नागरिकांकडून प्रचंड निदर्शने करण्यात आली.
गिलगिटमधील या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांचा पाकिस्तान सरकारविरोधातील रोष दिसून आला.
गिलगिटमध्ये नागरिकांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनाला इतकी गर्दी झाली होती की मुंगी शिरायलाही जागा नव्हती.
पाकव्याप्त काश्मीरच्या विविध भागांमधून गिलगिटमध्ये हजारो नागरिक आंदोलनासाठी जमले होते.
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना चांगली वागणूक दिली नाही. गिलगिट, खैबर पख्तून आणि बलुचिस्तानमधील अनेक नागरिकांना सरकार दुय्यम नागरिक असल्यासारखी वागणूक देते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे.
पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सैन्यांवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलोच बंडखोरांकडून हल्ले सुरू आहेत. कधी रेल्वे हायजॅक, तर कधी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला अशा पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलं जात आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत कमालीचे ताणले गेले आहेत.
या आंदोलनाला झालेल्या प्रचंड गर्दीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गिलगिटमधील स्थानिक नागरिकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष दिसून आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.