Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हाला शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजून जा Cancer झालाय? चाचण्यांशिवाय कर्करोग कसा ओळखायचा?

तुम्हाला शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजून जा Cancer झालाय? चाचण्यांशिवाय कर्करोग कसा ओळखायचा?
 

कर्करोग हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार असून गेल्या काही वर्षांमध्ये तो जगभरात झपाट्याने वाढ आहे. या आजारामुळे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार देशात 2022 मध्ये कर्करोगाचे 1.46 दशलक्ष रुग्ण होते. तर आता ही संध्या 2025 मध्ये 1.57 दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. कर्करोग होण्याची एक नाही तर असंख्य कारणे आहेत. हा आजार उशिरा लक्षात येतो. ज्यामुळे जीव वाचवणे कठीण होते. जर त्याची लक्षणे वेळेवर ओळखली गेली तर त्यावर उपचार देखील शक्य होतात. अशा परिस्थितीत, शरीरातील होणारे कोणते बदल हे कर्करोगाची लक्षणं असू शकतात त्याबद्दल जाणून घ्या.

शरीरात हे बदल दिसल्यास Cancer झाल्याची शक्यता
1. अचानक वजन कमी होणे

जर तुम्हाला कोणताही आहार किंवा व्यायाम न करता जलद वजन कमी होत असेल. 4-5 किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी झाल्यास ते चिंतेचा विषय असू शकते. कधीकधी पोट, फुफ्फुसे, स्वादुपिंड किंवा अन्ननलिकेचा कर्करोगाचे लक्षण असू शकतं.
 
2. वारंवार रक्तस्त्राव होणे

जर नाकातून, लघवीतून, खोकल्यातून किंवा मलमूत्रातून वारंवार रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आतड्याच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते, जसे की कोलन किंवा मूत्राशयाचा कर्करोग असल्याची शक्यता असते.

3. जुनाट खोकला किंवा आवाजात बदल

जर तुम्हाला अनेक आठवडे खोकला येत असेल किंवा तुमचा आवाज जड आणि विचित्र वाटत असेल तर ते फुफ्फुसाच्या किंवा घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतो.

4. शरीरात गाठ किंवा सूज येणे

जर मान, स्तन, काखेत किंवा इतर कुठेही असामान्य गाठ किंवा सूज दिसली, जी दाबल्यावर वेदना होत नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. हे कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

5. गिळण्यास त्रास होणे

जर अन्न गिळताना सतत त्रास होत असेल किंवा काहीतरी अडकल्यासारखे वाटत असेल तर हे घशाचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग दर्शवू शकते.

6. न बऱ्या होणाऱ्या जखमा

जर कापलेल्या किंवा जखमेला आठवडे झाले असतील, पण ती बरी होत नसेल, तर ते त्वचेच्या किंवा तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. विशेषतः तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.

7. त्वचेतील बदल

जर त्वचेवर नवीन तीळ, खूण किंवा तीळ दिसत असेल किंवा जुन्या तीळाचा रंग, आकार किंवा पोत बदलत असेल तर हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

8. थकवा आणि अशक्तपणा

सतत थकवा येणे, झोपल्यानंतरही थकवा जाणवणे, शरीरात सुस्ती येणे ही देखील काही प्रकारच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत, निष्काळजी राहण्याऐवजी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
घरी चाचणी कशी करावी

स्तनांची स्वतः तपासणी - महिलांनी दर महिन्याला त्यांच्या स्तनांमध्ये कोणत्याही गाठी किंवा बदलांची तपासणी करावी.

तोंड आणि जिभेची तपासणी: तोंडाच्या आत पांढरे डाग, फोड किंवा व्रण आहेत का ते आरशात पहा.

स्की तपासणी - जर शरीरावर नवीन तीळ, पुरळ किंवा रंग बदलला असेल तर काळजी घ्या.

लघवी किंवा विष्ठेमध्ये रंग, वास किंवा रक्ताची उपस्थिती कर्करोगाचे लक्षण असू शकते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ' सांगली दर्पण 'याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.