कीर्तनकार किशोर महाराजांनी संपवले जीवन
नांदागोमुख : येथील हभप महाराज किशोर देवराव वाडी (वय३७) यांनी शेतात संत्र्याच्या झाडाला गळफास लाऊन शनिवारी (ता. १९) जीवन संपवले. हभप किशोर देवराव वाडी हे नांदागोमुख येथील रहिवासी होते. त्यांनी लिहिलेल्या 'सुसाईट नोट'नुसार केळवद पोलिसांनी वाघोडा, तालुका सौंसर, मध्य प्रदेश येथील एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर वाढी यांचा भाऊ रुपेश वाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार खेडी, तालुका सौंसर येथील एका महिलेचे हभप कीर्तनकार किशोर वाडी यांच्यासोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिलेने खोटे प्रेम करून ७० हजार रुपये खर्च करायला लावल्यामुळे भावाने आत्महत्या केली, असा आरोप भाऊ रुपेश वाडी यांनी केला. याप्रकरणी केळवद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरुण राठोड, कांता रिजवाड पुढील तपास करीत आहेत.
किशोर महाराजांना भजन व कीर्तनाचा छंद असल्यामुळे ते बरेच दिवसापांसून देहू, आळंदी, मुंबई येथे जायचे. मागील महिन्यात नांदागोमुख येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्ताह साजरा झाला. त्यावेळी हभप शांताराम महाराज (पंढरपूर) यांच्यासोबत ते होते. १७ एप्रिलला नाशिकवरून घरी परतले होते. सतरापूर रोडवरील संत्राच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.