Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण

नवी मुंबईतील ड्रग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग? बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण
 

नवी मुंबई: बिल्डर गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या नंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपासणी पथकाची नेमणूक केली होती. चिचकर यांच्या दोन मुलांवर नार्कोटीक विभागाकडून चौकशी सुरू होती. चिचकर यांच्या दोन मुलांसह चार जण फरार असल्याने नारकोटीक विभागाकडून चिचकर यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे, चीचकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटल्यावर त्या दिशेने तपास करत असताना विशेष पथकाने मुख्यसूत्रधार कमलकुमार चंदवाणी उर्फ केके, सचिन भालेराव व संजय फुलकर या तीघांना अटक केली आहे.


नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे नशा मुक्त नवी मुंबई अभियान प्रभावीपणे शहरात राबवली जावे यासाठी मोर्चे बांधणी करून, विविध ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ जप्त करण्याचं काम करत आहेत. तर राजाच्या सैन्य दलातील काही शिपाईच राज्याच्या आदेशाच्या विरोधात काम करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी विकासक गुरुनाथ चिचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या नारकोटीक विभागाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिचकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करून चिचकर यांच्या दोन मुलांसह चार जणांकडे चौकशी सुरू केली होती. मात्र चौघेही फरार झाल्याने नार्कोटिक पथक गुरूनाथ चिंचकर यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप चिचकर यांनी सुसाईड लॉटमध्ये केला होता. त्यानुसार आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने सखोल तपास केल्यावर या प्रकरणात सचिन भालेराव व संजय फुलकर यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्यावर, विशेष तपास पथकाने गावी पळून गेलेल्या सचिन भालेराव तसेच संजय फुलकर याला अटक केली आहे.
गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर विशेष पथकाने केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळालेल्या माहितीवरून, कमलकुमार चंदवानी उर्फ केके आणी सचिन भालेराव यांचे अनेक वेळा फोनवर संभाषण झाले होते. तसेच भालेराव हा कमलकुमार चंदवानी उर्फ केके याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने भालेराव याचे हात देखील या प्रकरणात बरबटले असल्याने पोलिसांनी दोघा जणांना ही अटक केली आहे. सचिन भालेराव हा सध्या खारघर पोलिसात नेमकीनूस आहे. चिचकर यांच्या मुलाकडून परदेशातून आणलेल्या पदार्थाची कन्साईन पोहोचवण्याचा नियोजन हे पोलीस करत होते. याबद्दल त्यांना दरमहा पंधरा लाख रुपये मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हायड्रो गांजा प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक निगडे व त्यांच्या पथकाने 14 एप्रिल रोजी नेरुळ कारवाई केली होती. यामध्ये गुरूनाथ चिचकर यांचा मुलगा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. आज देखील परदेशातून आलेला ५ करोड रुपयांचा हायड्रो गांजा पोलिसांनी नवी मुंबईतून हस्तगत केला आहे. अशातच सचिन भालेराव व संजय फुलकर यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.