दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल, सोमवारी साजरी झाली. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन नरिमन यांनी राज्यघटनेबाबत एक भीती व्यक्त केली आहे. जर संविधानाच्या 'मूलभूत रचने'च्या
सिद्धांताला कोणत्याही प्रकारे धक्का बसला तर, जालियनवाला बाग
हत्याकांडासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे, असा इशाराच त्यांनी दिला.
माजी न्यायमूर्ती नरीमन यांच्या 'बेसिक
स्ट्रक्चर डॉक्ट्रिन: प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी' या
पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी झाले. सिद्धांत हे सर्वकालीन आहेत. ते कधीच नष्ट
होऊ शकत नाहीत, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे, एवढेच मी म्हणू शकेन, असे
माजी न्यायमूर्ती नरीमन यांनी यावेळी सांगितले.
माजी न्यायमूर्ती नरिमन यांनी, 1973च्या केशवानंद भारती खटल्याबद्दल भाष्य केले. या खटल्याने मूलभूत रचनेचा सिद्धांत आणि घटनात्मक सुधारणांच्या अधिकारावर मर्यादा घालून मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात त्याचे दीर्घकालीन परिणाम स्पष्ट केले. केशवानंद भारती खटल्यात 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने, सात विरुद्ध सहा अशा बहुमताने, 'संविधानाच्या मूलभूत रचनेचा' सिद्धांत स्पष्ट केला होता. त्यानुसार, संविधानाचा जो आत्मा आहे, त्यात सुधारणा करता येत नाही. जर त्यात काही परिवर्तन केले गेले तर, ते न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन असू शकते, असा तो निर्णय होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.