कुत्र्यांनी माणसांना चावण्याच्या घटना सामान्य असल्या, तरी अलीकडेच घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. संभाजी भिडे यांना चावलेल्या कुत्र्याबाबत आता नवा दावा पुढे आला आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. जय गायकवाड यांनी या कुत्र्याला शोधून त्याला दत्तक घेण्याचा आणि त्याच्या संपूर्ण देखभालीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
यासंदर्भात बोलताना अॅड. जय गायकवाड म्हणाले, "मी आजपर्यंत अनेक कुत्रे पाळले आहेत. मला नेहमीच अनुभव आला आहे की, माणुसकी आणि करुणा या बाबतीत अनेकदा कुत्रे माणसांपेक्षा श्रेष्ठ असतात. कुत्रे केवळ वेडे झाल्यावर नाही, तर समाजासाठी घातक असलेल्या व्यक्तींना ओळखूनही चावतात." त्यांनी पुढे सांगितले, "संभाजी भिडे हे या पिढीसाठी एक घातक विचारांचे प्रतीक आहेत. त्यांच्यातील माणूसपण संपलेले आहे, हे त्या कुत्र्याने ओळखले आणि त्याने धडा शिकवला. त्यामुळे मी त्या कुत्र्याचा शोध घेणार आहे. ज्याला भिडेंना चावल्याचा गौरव मिळाला, त्याचा मी पूर्ण सांभाळ करणार आहे. त्या कुत्र्याने जे केलं, ते समाजासाठी आवश्यक होतं."
तसेच, या कुत्र्याचा शोध घेत असल्याची
माहिती देत अॅड. गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केलं की, संबंधित
कुत्र्याची माहिती असल्यास 9503969098 या क्रमांकावर संपर्क साधावा.सध्या
या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कुत्र्याच्या वागणुकीवरून माणसाच्या चारित्र्याचा उल्लेख करणं ही घटना सोशल
मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.