Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सख्ख्या बहिणींवर गँगरेप; मटन खाऊ घातले, जबरदस्ती ड्रग्जही दिले, वाचा ही राक्षसी घटना

सख्ख्या बहिणींवर गँगरेप; मटन खाऊ घातले, जबरदस्ती ड्रग्जही दिले, वाचा ही राक्षसी घटना



हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर जबरदस्ती अत्याचार करुन धर्मपरिवर्तन करायला लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही अशीच एक राक्षसी घटना उघड झाली आहे. तेथे सख्ख्या बहिणींवर गांजा ओढायला लावून त्या नशेत गैंगरेप करण्यात आला. शिवाय कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.

 

कोठे घडली घटना?

ही घटना भोपाळमध्ये घडली. मुलीच्या एका मित्रांनो पोलिसांना घटना सांगितल्यावर ती उघड झाली. पोलिसांनी पिडीतेला अनेक दिवस धीर दिला. अखेर आपले नाव उघड होणार नाही, ही खात्री पटल्यावर तिने गुन्हा दाखल केला. मात्र जेव्हा या मुलीने पोलिसांसमोर घटना उघड केली, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा नुसता अत्याचार नव्हता तर लव्ह जिहादचा प्रकार होता. शिवाय पिडीतेच्या लहान बहिणीवरही त्याच मुलांनी अगदी तसाच अत्याचार केला होता.

प्रेमाच्या जाळ्यात ओढले

या घटनेतील पिडीता ही भोपाळमधील रायसेन रोडवरील एका महाविद्यालयात शिकत होती. काँलेजच्या पहिल्याच वर्षी तिची फरहानशी मैत्री झाली. फरहानने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिल २०२२ मध्ये फरहान पिडीतेला जहांगिराबाद येथे त्याचा मित्र हमीदच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला काहीतरी खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. फरहानने या अत्याचारे व्हिडीओ चित्रण केले.
लव्हजिहाद आला समोर

त्यानंतर फरहानने पिडीतेला धर्मांतर करण्यााच दबाव सुरु केला. फरहानच्या मित्रांनीही पिडीतेवर दबाव टाकून व्हिडीओ व्हायरल करायच्या धमक्या दिल्या. त्यानंतर तिला जबरदस्तीने रोजाचे उपवास ठेवायला लावले. जबरदस्तीने तिला मटन खाऊ घातले. एवढेच नाही तर पिडीतेला बुरखा घालायला लावून तिचे बुरखा घातलेले फोटोही काढले. या प्रकारानंत पिडीता फरहान व त्यांच्या मित्रांच्या जाळ्यात पूर्णपणे गुंतली.

बहिणीवरही अत्याचार
पिडितेला भोगल्यानंतर फरहान व त्याच्या मित्रांची पिडीतेच्या लहान बहिणीवर नजर गेली. ज्या अलीच्या घरात पिडीतेवर बलात्कार झाला होता, त्याच अलीने पिडीतेची लहान बहिण जाळ्यात ओढली. गेल्यावर्षी जून महिन्यात अली तिला आपल्या घरी घेऊन आला. तेथे तिला गांजा खाऊ घालण्यात आला. या नशेत अलीने तिच्यावर बलात्कार केला. हा बलात्कार फरहानने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवला. त्यानंतर पिडीतेच्या लहान बहिणीला ड्रग्ज देण्यात आले. त्यानंतर फरहाननेही तिच्यावर अत्याचार केला.

 

कशी फुटली वाचा?

अत्याचार व ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढल्यावर या दोन्ही बहिणींनी काँलेजला जाणे बंद केले. हा सगळा प्रकार त्यांच्या एका हिंदू मित्राला समजला. त्याने या दोघींना विश्वासात घेऊन सगळी घटना समजून घेतली. त्यानंतर त्या मित्राने पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी पिडीतेचे अनेक दिवस समुपदेशन केले. अखेर आपले नाव उघड होणार नाही, हे समजल्यावर पिडीतेने व तिच्या बहिणीने स्वतंत्र एफआयआर दाखल केल्या.

आरोपी केले जेरबंद

पोलिसांनी एफआयआर दाखल झाल्यावर फरहान, अली व त्याच्या मित्रांचे लोकेशन ट्रेस केले. गुप्तपणे सगळ्या आरोपींचा ठावठिकाणा काढला. त्यानंतर एकाच वेळी सर्व आरोपीपंना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तातडीने मोबाईल जप्त करण्यात आले. ज्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटींग काढले आहे, ते सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.