नाशिकमध्ये अनधिकृत सातपीर दर्गा रातोरात हटवला, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात
नाशिकच्या काठे गल्लीत परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरवात झाली. प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेने चालत आला. जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली यात चार अधिकारी आणि सुमारे 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर जमावाला पंगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पहाटे साडेपाचपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सकाळ पासून अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे. मध्यरात्री पोलिसांनी बाळाचा वापर केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. अतिक्रमण जवळपास जमीनदोस्त करण्यात आले असून बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरु आहे.
काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते. वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनवणी झाली. उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करता आले नसल्याने मनपाने दर्गा अनधिकृत ठरवून 15 दिवसाच्या आता अनधिकृत दर्गा काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्रीपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या परिसरात शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली असून बंदोबस्त कायम राहणार आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाई केली. प्रत्यक्ष कारवाई बुधवारी पहाटे साडेपाचला सुरु झाली. तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, रात्री दीड ते दोन वाजता याठिकाणी आलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक सुरु केली. यामध्ये अनेक पोलिसांच्या हात-पायाला जखमा झाल्या आहेत.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. आज सकाळपासून येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला आहे. तसेच काठेगल्ली या भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम 90 टक्के हटवण्यात आले आहे. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे. नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा राडारोडा बुलझोडरच्या सहाय्याने हटवला जात आहे. सध्या काठेगल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.