चिमुकली घरबाहेर खेळत होती, भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं चिरडलं; रस्ता रक्ताने माखला
नागपूर शहरातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला एका भरधाव कारने चिरडले आहे. अपघातानंतर कार थेट विजेच्या खांबावर आदळली. तसेच घरात घुसली. या भीषण अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने पकडले तसेच बेदम चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. माहेरा कौसर अशफाक सय्यद असे ९ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ही चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक एक भरधाव वेगाने कार आली. तिने चिमुकलीला उडवले. नंतर कार विजेच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला.
भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच मुलीला घेऊन तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तसेच कार चालकाला पकडून त्याला बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत चौकशीला सुरूवात केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले असून, अपघात कसा झाला, चालक कोणत्या अवस्थेत होता, याचा तपास सुरू आहे. चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांमध्येही संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.