ऐकलंत, महायुतीत निधी वाटप आणि विकासकामांवरुन धुमशान रंगलंय. त्यातच आता भाजपनं थेट शिंदे सेनेच्या आमदाराला झापलंय. महायुतीत राहायचं असेल तर राहा अन्यथा बाहेर पडा, असा इशाराच ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी शिंदे गटाला दिलाय.
तर बहुमत मिळाल्याने माज करु नये, असा पलटवार शिंदे गटाने केलाय. महायुतीत शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्याला डावललं जात असल्याची तक्रार अमित शाहांकडे केल्याचंही म्हटलं जातंय.. त्यापार्श्वभुमीवर अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.
तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत महायुतीच्या आमदारांची फडणवीसांकडे तक्रार
महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या आमदारांना झुकतं माप दिल्याचा आरोप
तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे 2 तर शिंदे गटाचे 1 आमदार
आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती
हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकरांचेही पत्रातून सावेंना खडेबोल
सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही दिला इशारा
एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनीही उडी घेत सावेंच्या अधिकारांवरच बोट ठेवलंय.धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं जातंय. त्यातच फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा ही भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची? हा प्रश्न अनुत्तरीत आहे... मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.