Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीडमध्ये चिकन विक्रीचा वाद, अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू!

बीडमध्ये चिकन विक्रीचा वाद, अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू!




गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटनांनी बीड महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, बंदुकीचा धाक, धाकदपट, किरकोळ कारणातून मारहाण अशा घटनांनी गुन्हेगारीच्या टोकावर जाऊन थांबलेल्या बीड जिल्ह्यात चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केज शहरातील या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे.


नक्की झाले काय?
चिकन विक्रीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाला त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान असलेल्या मुलाने उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना केज मध्ये घडली असून रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन आहे. तर याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान अल्पवयीन आरोपीचा शोध केज पोलिस घेत आहेत. केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एक धक्कादायक घटना


घडली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.

 

संतोष देशमुख प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचा समावेश

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाकरिता एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आल्यानंतर आता शासन निर्णयानुसार एसआयटी पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा आता एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याला अटक करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत होऊ शकते. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.