Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांनी बनावट शिवसेना तयार करून काहींना चालवायला दिली, राऊतांचा घणाघात

अमित शहांनी बनावट शिवसेना तयार करून काहींना चालवायला दिली, राऊतांचा घणाघात


मुंबई : नाशिकमध्ये बुधवारी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण असेला एक व्हिडीओ दाखविण्यात आला. त्यात भाजपाबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरही टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे भाषण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या 'कृत्रिम' आवाजाचा वापर केल्याबद्दल भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. तथापि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट संघटना तयार केली आणि या संघटनेला 'शिवसेना' हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायला लावले. नंतर महाराष्ट्रात ती काही लोकांना चालवायला दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्यांनी बनावट शिवसेना तयार केली आहे, त्यांनी टीका करू नये, असे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटाला सुनावले आहे. नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाचा जो व्हिडीओ दाखवला तो पहिल्यांदाच दाखवलेला नाही. 


मुंबईत झालेल्या शिबिरातही असा प्रयोग आम्ही केला होता. त्यावेळी मात्र यांचे लक्ष गेले नाही, असे ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे गेले आहे. शिंदे गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत बोलताना आम्ही देश कसा पुढे नेत आहोत, ही भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. शिंदे गट आणि भाजपाने मोदी यांचे ऐकायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी या लोकांचा काय संबंध? दुसरे म्हणजे, शेवटी हे विचार बाळासाहेबांचेच आहेत ना? त्यामुळ ते यांना बनावटच वाटणार, असे त्यांनी म्हटले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.