Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!

''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!
 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर दहा पेक्षा अधिकजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली असून, सौदी अरेबियाहून गृहमंत्री अमित शाह यांना थेट फोन लावला आणि तातडीने घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. शिवाय, तेथील सद्य परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचेही सांगितले आहे. याचबरोबर अमित शाह यांनीही ताताडीने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

दरम्यान या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राहुल गांधींनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटक मारले गेले आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अतिशय निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे. मी शोकाकुल कुटुंबीयांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटेल अशी अपेक्षा करतो.

तसेच, दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण देश एकजुट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी आता सरकारने जबाबदारी स्वीकारत ठोस पावलं उचलावीत. जेणेकरून अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशाप्रकारे आपला जीव गमावावा लागू नये. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या एका पीडित महिलेने एक खळबळजनक विधान केलं आहे. या महिलेने सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी आधी लोकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. महिलेने पीसीआरला फोन केला आणि सांगितले की, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी मारली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.