मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या आढावा कामगिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा दिग्गज मंत्री त्यांना नेमलेल्या लक्षवेधी कामगिरीत मागे पडले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी
आणखीन पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महायुतीतील महायुतीतील मंत्र्यांच्या शंभर
दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यात मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री
त्यांच्या खात्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करू शकले नसल्याचे त्यांच्या
निदर्शनास आले.
आढावा बैठकीत त्यांना त्याच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तसेच त्यांचा रिपोर्ट त्यांनी दिल्लीलाही धाडल्याचे सांगण्यात येते.आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कामगिरी अन्य मंत्र्यांच्या लक्ष्यापेक्षा मागे पडलेले आढळल्याने धक्का बसला. तसेच अन्य ज्येष्ठ मंत्रीही त्यांचे टार्गेट पूर्ण करु शकले नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट समज न देता विशेष काळजी घेऊन सूचना दिल्या आहेत. शंभर दिवसाच्या कामगिरीत अन्य मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक झाली आहे.
टार्गेट पूर्ण करणारे मंत्री
टार्गेट पूर्ण करणाऱ्या मंत्र्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांची नावे समाविष्ट आहेत असेही म्हटल्याचे समजते.
राणे, नाईकही असमाधानकारकमध्ये
असमाधानकारक मंत्र्याच्या यादीत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक व बंदरे मंत्री नितेश राणे यांची नावे असल्यामुळे मंत्रालयीन कर्मचारी आश्चर्यचकीत झाल्याचे वाटत होते. विधीमंडळ वा अन्य ठिकाणचा त्यांच्या कामांत ते अग्रेसर असल्याचे म्हटले जाते. मग त्यांच्या खात्याच्या कार्यक्षमतेत अन्य मंत्र्यांच्या कामगिरीच्या तुलनेत ते मागे पडले असल्याची शक्यताच नसल्याचे त्यांचे मत असल्याची चर्चा दबक्या आवाजात मंत्रालयांत होती.परंतु मंत्र्यांच्या चर्चेनुसार वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही.
एकनाथ शिंदेंना मुदतवाढ
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीत स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच त्यांना नेमून दिलेल्या कामाच्या लक्ष्यापासून मागे पडले आहेत. पंधरा दिवसांची मुदत त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे पण त्यांच्याकडील अन्य मंत्र्यांच्या कामाच्या रगाड्यात तसेच अभ्यांगतांची त्यांच्याकडे कामासाठी वाढलेली गर्दी यामुळे शिंदेंना आणखीन काही दिवसांची मुदतवाढ त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी देणं भाग पडणार असल्याचेही बोलले जात आहे.उपमुख्यमंत्री शिंदेंसह शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही खात्याच्या कामगिरीत त्यांची पिछाडी झाल्याचे दिसून येत आहे.परिवहन व पाणीपुरवठाची प्रत्यक्ष नेमलेली कामे अनुक्रमे २५ व ४० टक्क्यापर्यंतच लक्ष्य त्यांना गाठण्यात यश आल्याचे म्हणण्यात आले आहे. या खात्यांचा बहुतकरुन खेडेगावांशी जास्ती संपर्क असल्यामुळेही मंत्री सुपर असूनही खात्यातील अधिकाऱ्यांची पूर्ण क्षमता नसल्याने त्यांचे टार्गेट पुढे सरकले नसल्याचेही नमूद केल्याचे समजते. शिक्षणमंत्री भुसेंचे काम पंधरा दिवसांत पूर्ण होण्यासारखे असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.रायगड पालकमंत्रीपद व लाडकी बहिण यामुळे राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या महिला व बालकल्याण विकासच्या मंत्री आदिती तटकरे या त्यांच्या खात्याचे टार्गेट नियोजीत वेळेत गाठू शकल्या नाहीत.त्या फारशा मागे पडल्या नसल्या तरी त्यांच्याकडील खात्याचे महत्व लक्षांत घेता त्यांना नेमलेले टार्गेट आता त्यांनी पूर्ण करावे असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या टार्गेट गाठू न शकल्याने थेट कान टोचले नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रमाणे मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.