सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये 21 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत मराठी चित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे 41 चित्रपट विनामुल्य पाहता
येणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात घोषणा
केली आहे. शेलार यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपताका या मराठी
चित्रपट महोत्सव 2025 माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली
आहे. या चित्रपट महोत्सवाचं वेळापत्रकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महोत्सवात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्यात येमार आहेत. या चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे 99' चित्रपटाने होईल. तर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाने 24 एप्रिलला सांगता होईल.
चित्रपट महोत्सवाचं वेळापत्रक
चित्रपताका चित्रपट महोत्सवामध्ये एकूण 41 चित्रपट दाखवले जातील. प्रेक्षकांना हे चित्रपट विनामूल्य दाखवले जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी ऑफलाइन नोंदणीही सुरु आहे. आशिष शेलार यांनी X अकाउंटवर चित्रपट महोत्सवाचं वेळापत्रक शेअर केलं आहे. या वेळापत्रक शेअर करत त्यांनी लिहिलंय की, "महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' मराठी चित्रपट महोत्सव येत्या 21 ते 24 एप्रिल रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होत आहे. या महोत्सवात दर्जेदार 41 मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आज या महोत्सवाच्या वेळापत्रकाची घोषणा केली."
शेलार यांनी पुढे लिहिलं की, "या
चित्रपताका महोत्सवात पाणी प्रश्नावर भाष्य करणारा पाणी, येरे येरे पावसा,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित तेरव, स्त्री जीवनावर आधारित बाई पण भारी
देवा, तिचं शहर होण, बटरफ्लाय, पिता-पुत्राच्या भावनिक सबंधांवर आधारलेला
बापल्योक, जून फर्निचर, कुलूप, ग्रामीण जीवनावर आधारित गाभ, ग्लोबल आडगाव,
पळशीची पिटी, भेरा, ऐतिहासिक पावनखिड, सामाजिक मदार, रोंदल, या गोष्टीला
नाव नाही, जयंती, मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारा इंटरनॅशनल फॅलोमफोक,
स्वातंत्रसंग्रामवर आधारित शहीद भाई कोतवाल, या विषयासह मी वसंतराव,
कारखानीसांची वारी, वाळवी या चित्रपटांचे प्रदर्शन यावेळी होणार आहे. तसेच,
परिसंवाद, चर्चासत्र व मुलाखतींचेही नियोजन करण्यात आले आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.