वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो. भारतात अनेक जमीनींवर वक्फ बोर्डाने दावा केला. यामुळे हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली. वक्फ काद्यात सुधारणा करण्यासाठी वक्फ
बोर्ड सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रासह
भारतातील 38,16,291.788 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे समजते.
भारतात एकूण 32 वक्फ बोर्ड आहेत.
राज्यनिहाय आकडेवारी पाहिली असता सर्वात जास्त जमीन उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात (सुन्नी) 2.17 लाख मालमत्ता वक्फच्या नावावर आहे. याची एकूण क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर पश्चिम बंगाल (80,480 मालमत्ता), पंजाब (75,956), तामिळनाडू (66,092) आणि कर्नाटक (62,830) यांचा क्रमांक लागतो. राज्यांमध्ये 32 ठिकाणी 8,72,328 मालमत्ता आहेत, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ 38,16,291.788 एकर आहे.
14 मार्च 2025 पर्यंत, वक्फ मॅनेजमेंट
सिस्टम इन इंडिया पोर्टलवर वक्फ बोर्डाची मालमत्ता आणि जमीनीची माहिती
प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, 38 लाख एकरपेक्षा जास्त
क्षेत्रात पसरलेल्या 8.72 लाख नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत. यापैकी 4.02
लाख वापरकर्ते वक्फ आहेत. 9,292 प्रकरणांसाठी मालकी हक्काची कागदपत्रे
अपलोड करण्यात आली आहेत. फक्त 1,083 प्रकरणांमध्ये संबंधित वक्फ कागदपत्रे
आहेत.
विविध राज्यांमधील वक्फ बोर्डाच्या जमीनी आणि मालमत्ता
अंदमान आणि निकोबार वक्फ बोर्ड 151 मालमत्ता आणि 178.09 एकर जमीनआंध्र प्रदेश राज्य वक्फ बोर्ड14,685 मालमत्ता आणि 78, 299 एकर जमीनआसाम वक्फ बोर्ड 2654 मालमत्ता 6,618 एकर जमीनबिहार राज्य (शिया) वक्फ बोर्ड 1750 मालमत्ता 29, 009.52 एकर जमीनबिहार राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 6866 मालमत्ता1,69, 344.82 एकर जमीनचंदीगड वक्फ बोर्ड 34 मालमत्ता 23.36 एकर जमीनछत्तीसगड राज्य वक्फ बोर्ड4230 मालमत्ता आणि 12,347 एकर जमीनदादरा आणि नगर हवेली वक्फ बोर्ड 30 मालमत्ता आणि 441 एकर जमीनदिल्ली वक्फ बोर्ड 1047 मालमत्ता आणि 28.9 एकर जमीनगुजरात राज्य वक्फ बोर्ड 39940 मालमत्ता आणि 86,438.95 एकर जमीनहरियाणा वक्फ बोर्ड 23,267 मालमत्ता आणि 36,482.4 एकर जमीनहिमाचल प्रदेश वक्फ बोर्ड 5,343 मालमत्ता आणि 8,727.6 एकर जमीनजम्मू आणि काश्मीर औकाफ बोर्ड32, 533 मालमत्ता 3,50,300.75 एकर जमीनझारखंड राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 698 मालमत्ता 1,084.76 एकर जमीनकर्नाटक राज्य औकाफ बोर्ड62,830 मालमत्ता आणि 5,96,516.61 एकर जमीनकेरळ राज्य वक्फ बोर्ड53,282 मालमत्ता आणि 36,167.21 एकर जमीनलक्षद्वीप राज्य वक्फ बोर्ड 896 मालमत्ता आणि143.81 एकर जमीनमध्य प्रदेश वक्फ बोर्ड33,472 मालमत्ता आणि 6,79,072.39 एकर जमीनमहाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड 36701 मालमत्ता आणि 20,1105.17 एकर जमीनमणिपूर राज्य वक्फ बोर्ड 991 मालमत्ता आणि 10,077.44 एकर जमीनमेघालय राज्य वक्फ बोर्ड 58 मालमत्ता आणि889.07 एकर जमीनओडिशा वक्फ बोर्ड 10,314 मालमत्ता आणि 28,714.64 एकर जमीनपुद्दुचेरी राज्य वक्फ बोर्ड 693 मालमत्ता आणि 352.67 एकर जमीनपंजाब वक्फ बोर्ड 75,965 मालमत्ता आणि 72,867.89 एकर जमीनराजस्थान मुस्लिम वक्फ बोर्ड30,895 मालमत्ता आणि 5,09,725.57 एकर जमीनतामिळनाडू वक्फ बोर्ड66,092 मालमत्ता आणि 6,55,003.2 एकर जमीनतेलंगणा राज्य वक्फ बोर्ड 45,682 मालमत्ता आणि 1,43,305.89 एकर जमीनत्रिपुरा वक्फ बोर्ड 2,841 मालमत्ता आणि 1,015.73 एकर जमीनउत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड15,368 मालमत्ता आणि 20,483 एकर जमीनउत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड2,17,161 एकर जमीनउत्तराखंड वक्फ बोर्ड5,388 मालमत्ता आणि82,011.84 एकर जमीन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.