Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देश रक्तात न्हालाय, 28 मृत्यूंनंतरही IPL थांबत नाही; टीकेनंतर BCCI चा मोठा निर्णय

देश रक्तात न्हालाय, 28 मृत्यूंनंतरही IPL थांबत नाही; टीकेनंतर BCCI चा मोठा निर्णय
 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निरपराध नागरिकांचा बळी गेला असून, यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. देशभरात दुःखाचे वातावरण असताना, आयपीएलचा ( IPL 2025 ) जल्लोष सुरूच असल्यामुळे BCCI वर टीका होत आहे. देश दुःखात, देश रक्तात न्हालाय, IPL मात्र रंगात असल्याची टीका IPL वर होत आहे. या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने स्पष्टीकरण देत SRH आणि MI या संघांमधील सामनामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे चार मुख्य निर्णय:
सामन्यादरम्यान सर्व खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या बांधणार
 
सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले जाईल

स्टेडियममध्ये चीअरलीडर्स नसतील

फटाक्यांचा वापर होणार नाही, संपूर्ण वातावरण शांत ठेवले जाईल
हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने सामन्यात बदल केला असला तरी अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, दिलीप डिसले (मुंबई), कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी आणि अतुल मोने (पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवांना परत आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. "लष्करातील भरती थांबवून सैन्याची ताकद 1.8 लाखांनी घटवण्याचा निर्णय कोणाचा 'शहाणपणा' होता?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.