Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

200 कोटी लोकांच्या लिव्हरमध्ये भरलेत घाणेरडे फॅट्स, 4 पदार्थ खाऊन आजाराला करा छुमंतर

200 कोटी लोकांच्या लिव्हरमध्ये भरलेत घाणेरडे फॅट्स, 4 पदार्थ खाऊन आजाराला करा छुमंतर
 

लोक अनेकदा मधुमेह, हृदयरोग किंवा लठ्ठपणामुळे होणाऱ्या सांध्याच्या समस्यांबद्दल बोलतात, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की जास्त वजन तुमच्या यकृतावरही परिणाम करते. यकृत अर्थात लिव्हर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे, अन्न पचवण्याचे आणि पोषक तत्वांचा साठा करण्याचे काम करते. फॅटी लिव्हर हा एक जीवनशैलीचा आजार आहे जो अत्यंत धोकादायक असू शकतो. हा आजार अस्वास्थ्यकर आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने होतो. अल्कोहोलमुळे हा आजार धोकादायक बनू शकतो आणि यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो. जगातील लाखो लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की यकृताचे डॉक्टर ते टाळण्यासाठी काय खातात?

लिव्हरतज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी ४ स्नॅक्स खाण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले की ते स्वतः दर आठवड्याला ते खातात. ते पुढे म्हणाले की जगातील सुमारे २०० कोटी लोकांना फॅटी लिव्हरचा आजार आहे आणि याचे सर्वात मोठे कारण खराब अन्न आहे. मात्र यासाठी नक्की काय करायला हवे यासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
बेरीजसह दही

दह्यात बेरीज मिक्स करून खावे फॅटी लिव्हर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून दह्यासह बेरीज खाऊ शकता. यातील प्रोबायोटिक आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत करते. याशिवाय गट आणि लिव्हर हेल्थ सुधारण्यासाठी दही आणि बेरीज हे समीकरण उत्तम ठरते. फॅटी लिव्हरची समस्या लवकर कमी करण्यास हे खाणे उपयुक्त ठरते


खजूर खाणे फायद्याचे
खजूर आणि अक्रोड समीकरण ठरेल उत्तम खजूर हे अँटीऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस मानले जाते. डॉक्टर अक्रोड आणि खजूर एकत्र खाण्याचा सल्ला देतात. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असून खजूर आणि अक्रोड हे दोन्ही अत्यंत हेल्दी स्नॅक मानले जाते. तुमचे पोट लवकर भरते आणि याशिवाय एनर्जीही राहते. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मिक्स नट्स आणि डार्क चॉकलेट्स

डार्क चॉकलेटसह नट्स मिक्स करून खावे मिक्स नट्समध्ये विटामिन ई चा चांगला स्रोत आहे आणि हे तुमच्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसंच लिव्हर चांगले राखण्यासाठी डार्क चॉकलेट खाणेही फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेट आणि नट्स एकत्र करून खाल्ल्याने फॅटी लिव्हरची सूज कमी होण्यास मदत होते आणि लिव्हर हेल्दी राहण्यास मदत मिळते.

सफरचंद, दालचिनी आणि मध
सफरचंद ठरतील फायदेशीर सफरचंद आणि दालचिनीसह मध मिक्स करून त्याचे सेवन करावे. सफरचंद खाल्ल्याने लिव्हरसह गट हेल्थदेखील चांगली राहते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांना हे खाणे अधिक आवडते. हे स्नॅक्स आपले लिव्हर चांगले ठेवण्यासाठी आणि फॅटी लिव्हरच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी तुम्ही नियमित खाऊ शकता.
काय आहे लिव्हरसाठी हेल्दी स्नॅक्स?


टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.