गुन्हेगार बनला न्यायाधीश, 2 महिन्यात 2740 कैद्यांची जैलमधून सुटका केली; धनीराम मित्तलची शॉकिंग स्टोरी
गुन्हेगार न्यायाधीश बनला आणि त्याने 2 महिन्यात 2000 कैद्यांची जैलमधून सुटका केली... हा एखाद्या चित्रपटाचा फिल्मी सीन वाटतोय ना. मात्र, ही भारतातील धनीराम मित्तल नावाच्या चोराची खरी खुरी आणि शॉकिंग स्टोरी आहे. विशेष म्हणजे धनीराम मित्तल हा असा गुन्हेगार आहे जो कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही.
कायद्याची पदवी, हस्तलेखन तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजिस्ट अशी उच्चशिक्षित पार्श्वभूमी असतानाही धनीराम याने चोरीचा मार्ग निवडला होता. चोरी हे त्याच्यासाठी पॅशन होते. 1939 मध्ये हरियाणामधील भिवानी येथे धनीराम मित्तल याचा जन्म झाला. धनिराम याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, चंडीगड आणि पंजाब या राज्यांमधून सुमारे 1 हजारांहून अधिक कार चोरल्याचे सांगितले जाते. धनीराम हा एक सराईत चोर होता. दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि आसपासच्या परिसरातून दिवसाढवळ्या तो चोरी करायचा. धनिराम याच्या विरोधात फसवणुकीचेही 150 हून अधिक गुन्हे दाखल होते.धनीरामचा कारनामा जाणून घ्यायचा असले तर आपल्याला 1970 सालात जावे लागेल. झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशीचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते. त्यानंतर धनीराम याने असा प्लान बनवला ज्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. अतिरिक्त न्यायाधीशांबद्दलची सर्व माहिती गोळा केली. कुठूनतरी त्याने त्यांचा पत्ताही शोधून काढला. त्याने एक पत्र लिहून ते सिलबंद लिफाफ्यात घालून त्यावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारचा शिक्का मारला. तसेच ते चौकशी सुरू असलेलेल्या न्यायाधीशाच्या घरी पाठवले.
धनीराम याने न्यायाधीसांना 2 महिन्यांच्या सक्तीच्या रजेचे पत्र पाठवले होते. पत्रावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारचा शिक्का होता. धनीराम हस्तलेखनाची नक्कल करण्यात पटाईत होता. न्यायाधीशांनाही हे पत्र खरं वाटलं. आदेश मानून न्यायाधीश सुट्टीवर गेले. धनीरामने जसे न्यायाधीशांना बनावट पत्र पाठवले तसेच बनावट पत्र कोर्टाला पाठवलं. अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन न्यायाधीश पदभार स्वीकारतील असे लिहिले होते. दुसऱ्याच दिवशी धनीराम न्यायाधीशांचा पोशाख घालून न्यायालयात पोहोचला. कोर्टातील कर्मचारी वर्गाने त्याला खरा न्यायाधीश मानत होते.
न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती चोर आहे हे कुणाच्याच लक्षात आले नाही. 40 दिवस धनीराम याने धुमाकूळ घातला. कोर्टात हजारो खटल्यांची सुनावणी करताना धमीरामने 2740 आरोपींना जामीन दिला. एवढंच नाही तर स्वतः विरोधातील खटल्याची स्वतःच सुणावणी देखील केली. स्वतःची त्याने निर्दोष मुक्तता करून घेतली. आपला कानामा उघड होण्याआधीच धनीराम तिथून पसार झाला. धमीराम कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही. एप्रिल 2024 मध्ये धनीरामचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.