केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने पुन्हा एकदा नियमित वर्ग न करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट इशारा दिला आहे. नवीन नियमांंनुसार आता सीबीएसईने विशिष्ट टक्के हजेरी वर्गात नसली तर अशा विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. दुसरे म्हणजे या विद्यार्थ्यांना आता
बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच
सावध होण्याची गरज आहे. त्याचबरोबर बोगस महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे बोर्डाकडून सांगितले जात आहे.
डमी शाळांवर देखील होणार कडक कारवाई
एका
वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात पीटीआशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली
आहे. त्यांनी सांगितले की, डमी स्कूल सिस्टीमला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा
अनुपस्थित विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी दाखल करणाऱ्या अशा काही शाळा
देखील दिसून आल्या आहेत, अशा शाळांवर देखील आम्ही कडक कारवाई करणार आहोत.
..तर ती सर्व पालकांची जबाबदारी असेल!
मिळालेल्या माहितीनुसार, नियमित सीबीएसई शाळांमध्ये न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसण्यास बंदी घातली जाणार आहे. हा नियम अतिशय कडक असणार आहे. "डमी शाळांमध्ये" प्रवेश मिळवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची असेल, त्यामुळे पालकांना आता त्यांच्या पाल्याची काळजी घेण्याची व प्रवेशाबाबतचा योग्य निर्णय घेण्याची गरज भासणार आहे.
गैरहजर विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेतून मुकावे लागणार
सीबीएसई
त्यांच्या परीक्षा नियमांमध्ये सुधारणा करत आहेत. त्यानुसार काही
नियमावलीमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. डमी शाळांमधील विद्यार्थ्यांना
बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS) परीक्षेला बसावे
लागेल.
तपासणीत गैरहजर दिसल्यास थेट 'ही' कारवाई
सीबीएसईच्या
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "जर तपासणी दरम्यान एखादा
विद्यार्थी शाळेत गैरहजर आढळला किंवा नियमितपणे वर्गात येत नसेल तर त्याला
बोर्डाच्या परीक्षेत बसण्यास मनाई केली जाऊ शकते."
बोर्डाच्या परीक्षेसाठी किती टक्के उपस्थिती अनिवार्य
सीबीएसई प्रशासकीय मंडळाची काही दिवसांपूर्वीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष करून 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी किमान 75% उपस्थिती अनिवार्य असेल. सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सीबीएसईच्या नियमांनुसार, केवळ नोंदणी केल्याने विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही. त्याला किंवा तिला किमान 75% उपस्थिती शाळेत दाखवावी लागणार आहे.
फक्त या विद्यार्थ्यांना गैरहजेरीतून 25% मिळेल सूट
सीबीएसईच्या उपस्थिती धोरणानुसार पात्र नसलेले विद्यार्थी एनआयओएस परीक्षेद्वारे बोर्डाच्या परीक्षेत बसू शकतील. वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग किंवा इतर गंभीर परिस्थितीतच 25% उपस्थितीला परवानगी दिली जाणार आहे.
विद्यार्थी बोगस शाळांमध्ये का घेतात प्रवेश?
मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी स्वतंत्र क्लासेस लावून अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागल्याने विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात नाहीत. त्यामुळे ते डमी शाळांमध्ये प्रवेश घेऊन ठेवतात. फक्त परीक्षांसाठी ते या ठिकाणी येत असल्याचे दिसून आले.याशिवाय, काही विद्यार्थी राज्य कोट्याचे फायदे मिळविण्यासाठी डमी शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे देखील दिसून आले आहे. दिल्लीतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दिल्ली राज्य कोटा मिळविण्यासाठी, अनेक विद्यार्थी दिल्लीतील डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. डमी शाळांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत आहे. कारण हे विद्यार्थी नियमित वर्गात येत नाहीत आणि फक्त बोर्डाच्या परीक्षांसाठी शाळेत येतात. सीबीएसई लवकरच एनआयओएसच्या सहकार्याने यावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते, जी पुढील शैक्षणिक सत्रापासून लागू केली जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.