'माझ्या पत्नीचे ३-४ बायफ्रेंड आहेत. तिचे बाहेर लफडे आहेत. तिने स्वतःच्या मोठ्या मुलाचा खून केलाय. आता ती तिच्या प्रियकरासोबत माझाही 'काटा' काढेल... अशी भिती एका पतीने व्यक्त केलीय. शिवाय आपल्या तक्रारीकडे
मुख्यमंत्र्यांनी लक्ष जावे यासाठी या पतीने एक अनोख्या पद्धतीचे आंदोलनही
केले. मुख्यमंत्र्यांच्या फ्लेक्सखाली हातात पत्नीच्या 'कारनाम्याचा फलक'
घेऊन या पतीने भर रस्त्यावर फलक निषेध केला. हा अनोख्या आंदोलनाची सध्या
देशभर चर्चा सुरु आहे.
कशामुळे वाढली पतीची भिती?
प्रियकराच्या
मदतीने पतीचा खून करण्याच्या घटना सध्या देशात चांगल्या गाजत आहेत. मेरठ
येथील एका पत्नीने तिच्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करुन त्याचे अवयव
एका ड्रममध्ये भरुन त्यावर काँक्रीट ओतल्याचे उघड झाले. पोलिसांनी पत्नीसह
प्रियकराला अटक केली. त्यानंतर त्याच आठवड्यात अशाच पद्धतीच्या इतर दोन
घटनाही उघडकीस आल्या. या घटना समजल्यानंतर या पतीला आपलाही काटा काढला जाईल
अशी भिती वाटू लागली. त्यानंतर त्याने आज हे अनोखे आंदोलन केले.
नेमका काय आहे प्रकार?
या आंदोनलकर्त्याचे नाव अमित कुमार सेन आहे. तो ३८ वर्षांचा आहे. तो एमपीतील जनकपुरी येथील रहिवासी आहे. अमित कुमारला त्याच्या पत्नीकडून अनेकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याने याबाबत पोलिसांतही तक्रार केली मात्र पत्नीवर कारवाई झालेली नाही. आपला मोठा मुलगा हर्ष सेन यालाही पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवले असा गंभीर आरोप अमित कुमार याने केला आहे. पत्नी ही सध्या तिच्या प्रियकरासोबत वेगळी राहत असून तिने माझ्या छोट्या मुलालाही सोबत नेले आहे. आता ती तिच्या प्रियकराच्या मदतीने माझा गेम वाजवील, अशी भिती अमित कुमारने व्यक्त केली आहे.
काय केले आंदोलन?
अमित
कुमार सेन याने शुक्रवारी फूलबाग क्रॉसिंगवर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
यांच्या पोस्टरखाली हातात फलक घेऊन धरणे आंदोलन केले. रस्त्यावर बसलेल्या
अमितच्या हातात एक फलक आहे. त्यावर लिहिले आहे की, मुख्यमंत्री साहेब.
कृपया माझ्या पत्नीला शिक्षा करा. तिने माझा विश्वासघात केला आहे. माझ्या
मुलाची हत्या केली आहे. ती माझा खूनही करू शकते. अलिकडेच देशात अशा अनेक
घटना समोर आल्या आहेत. जिथे पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची
हत्या केली आहे. माझ्या पत्नीलाही ३-४ बॉयफ्रेंड आहेत. ती माझीही हत्या
करेल... असे फलकावर लिहले आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
अमित कुमारच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी त्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. जनकगंज पोलिस ठाण्याचे म्हणणे आहे की, सध्या त्यांना या प्रकरणाबाबत कोणतीही तक्रार मिळालेली नाही. जर तक्रार आधी दाखल केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.