Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असतं? अजय देवगणच्या घराबाहेर दारुच्या बाटल्यांचा खच तर श्रद्धाच्या घराबाहेर...

सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असतं? अजय देवगणच्या घराबाहेर दारुच्या बाटल्यांचा खच तर श्रद्धाच्या घराबाहेर...
 

सोशल मीडियावर एका कंटेट क्रिएटरने फारच विचित्र चॅलेंज स्वीकारलं असून सध्या या चॅलेंजमुळेच तो सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. मुंबईमधील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये नेमकं काय आहे हे तपासण्याचं आव्हान स्वीकारणारा हा कंटेट क्रिएटर सध्या व्हायरल झाला आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार अभिनेता अक्षय कुमारच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्यात चक्क एक पुरस्काराचं सन्मानचिन्ह म्हणजेच ट्रॉफी आढळून आली आहे. या पेक्षा चाहत्यांना अधिक धक्का अभिनेता अजय देवगणच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्यात रिकाम्या दारुच्या बाटल्या पाहून बसला आहे.


कोण आहे हा कंटेट क्रिएटर?
ज्या कंटेट क्रिएटरने हे आगळं-वेगळं चॅलेंज स्वीकारलं आहे त्याचं नाव आहे सार्थक सचदेव! त्याने बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन सेलिब्रिटींच्या घराबाहेरचे कचऱ्याचे डब्बे उचकून पाहतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सलमानच्या घरातून काय फेकण्यात आलं?

या व्हिडीओची सुरुवातच सलमान खानच्या घराबाहेरचा कचऱ्याचा डबा उघडून होते. सलमानच्या घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्ब्यात तांदळ्याच्या रिकाम्या पिशव्या सापडतात. या पिशव्या सार्थक कॅमेरावर दाखवतो.

अजय देवगणच्या घराबाहेरील डब्ब्यात दारुच्या बाटल्या
त्यानंतर सार्थक अजय देवगणच्या घराबाहेर गेला. या ठिकाणी त्याने अजय देवगणच्या घरातील कचऱ्याचा डबा उघडून पाहिला असता त्यामध्ये चॉकलेट्सची कागदं, तंबाखूची पाकिटं आणि इतर पादार्थांची पाकिटं सापडली. तसेच या कचऱ्याच्या डब्ब्यात अनेक दारुच्या रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या.
अक्षय कुमारच्या घरातून कोणता कचरा बाहेर पडला?

पुढे अभिनेता अक्षय कुमारच्या घराबाहेरील कचऱ्याचा डबा उघडून पाहिला असता त्यामध्ये नारळ्याच्या करवंटीचे काही तुकडे, फेकून दिलेली चित्रपटाची स्क्रीप्ट आणि पुरस्कार म्हणून दिलेलं सन्मानचिन्हं सापडलं.

श्रद्धा कपूरच्या घराबाहेरील कचऱ्यात सापडली आश्चर्यचकित करणारी गोष्ट
पुढे सार्थक सचिन तेंडुलकर आणि श्रद्धा कपूरच्या घराबाहेर ठेवलेले आणि या दोन्ही सेलिब्रिटींच्या घरातून आलेल्या कचऱ्याच्या डब्यात डोकावला. यामध्ये त्याला पाण्याच्या बाटल्या, रिकामे डब्बे, इअरफोन आणि अगदी एअरपॉड्सही सापडले. श्रद्धाच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्यात एअरपॉड्स सापडले.
अनेकांच्या रंजक कमेंट्स

हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया या सेलिब्रिटींच्या चाहत्यांनी नोंदवल्या असून अनेकांनी हा नवा उद्योग म्हणून उत्तम असल्याचं म्हटलं आहे. हा उत्तम कंटेट असल्याचं एकाने म्हटलं आहे. काहींनी अक्षय कुमारवर टीका करताना त्याने अशाप्रकारे सन्मान म्हणून देण्यात आलेला पुरस्कार फेकून दिल्याबद्दल टीका केली आहे.

पुढल्या आठवड्यात शाहरुखच्या घराबाहेर?
सार्थकने पुढील आठवड्यामध्ये शाहरुख खानच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्ब्यात नेमकं काय सापडतं हे दाखवणार असल्याचं आश्वासन फॉलोअर्सला दिलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.