Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्यवसाय सुरु करायचाय? कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय २० लाखांचे लोन; अर्ज कसा करावा?

व्यवसाय सुरु करायचाय? कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय २० लाखांचे लोन; अर्ज कसा करावा?
 

केंद्र सरकार नेहमीच लहान उद्योजकांना प्रोत्साहन देते. अनेक तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. स्वतः चा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकार जवळपास २० लाख रुपयांपर्यंतचे लोन देते.

हे लोनचे पैसे घेऊन तुम्ही स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आधी फक्त १० लाखांचे लोन मिळायचे. परंतु आता ही रक्कम वाढवून २० लाख करण्यात आली आहे. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला लोन मिळणार आहे.  पीएम मुद्रा योजनेत व्यवसाय शुन्यातून उभा करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी लोन देतात. हे लोन खूप कमी व्याजदरात दिले जातात. यामध्ये सुरुवातीला ५०,००० रुपयांपासून लोन दिले जाते. २० लाखांपर्यंत हे लोन दिले जाते. या योजनेसाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.

पीएम मुद्रा योजनेत तीन प्रकारचे लोन दिले जातात.या योजनेत तुम्हाला २० लाखांचे लोन तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही त्याआधीचे लोन पूर्णपणे फेडले आहे. त्यानंतरच हे पैसे दिले जाणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा बँकेतील रेकॉर्ड चांगला असायला हवा. तसेच त्याच्याकडे कामाच अनुभव असावा. 

या योजनेत तीन कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन दिले जातात. यात शिशु लोनमध्ये ५० हजार रुपये दिले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज नाही. त्यानंतर ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. तुम्ही हे लोन फेडल्यानंतरच तुम्हाला २० लाखांचे लोन मिळणार आहे. या योजनेत लहान दुकानदार, फळ, फूड प्रोसेसिंग यांसारखे उद्योग सुरु करु शकतात. यासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा. त्यांची बँकेत कोणतीही डिफॉल्ट हिस्ट्री नसावी. त्यानंतर बँकेत अकाउंटदेखील असायला हवे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.