कर्मवीर पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा तसेच नव्याने शाखा विस्तारास मंजुरी चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली यांना आणखी २ शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. कर्मवीर पतसंस्थेने नुकतेच एका पतसंस्थेचे विलीणीकरण करुन घेतले. त्याबद्दल
संस्थेला दोन शाखा नव्याने सुरु करणेस मंजुरी मिळाली. त्यातील एक शाखा
गणेशनगर, सांगली येथे व दुसरी शाखा रुई ता. हातकणंगले येथे सुरु करणेस
मंजुरी मिळाली.
तसेच यापुर्वी मंजुर झालेल्या शाखा गोकुळ शिरगांव, उचगांव कराड वारणा कोडोली या चार शाखासह एकुण सहा शाखा लवकरच सुरु करणार असून संस्थेचा शाखा विस्तार ७० शाखापर्यंत होईल अशी माहिती श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली. नविन भागातील सभासदांचे जीवन कर्मवीर
पतसंस्थेच्या विविध योजनांच्या माध्यमातून उंचावण्याची संधी आम्हाला मिळाली
आहे. त्याचा निश्चित आम्ही वापर करुन कर्मवीर पतसंस्थेचा नांवलौकीक वाढवू
अशी भावना त्यांनी बोलून दाखविली.
आज रोजी कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी रु. १२४० कोटी असून रुपये ९४३ कोटीचे कर्जवाटप संस्थेने केले आहे. १२ मार्च २०२५ रोजी संस्थेने ३८ वर्षाची अविरत सेवा पुर्ण करुन ३९ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेत कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कालावधीत सभासदांचा मोठा विश्वास संस्थेला प्राप्त झाला. त्याबद्दल सर्व सभासदांचे त्यांनी मनापासून आभार मानले. संस्थेचा स्वनिधी रु. १२० कोटीच्या पुढे आहे. संस्थेने अन्य बँकात रु.४३५ कोटीची गुंतवणूक केली आहे. संस्थेचे खेळते भांडवल रु.१४३७ कोटीचे आहे. सभासद संख्या ६८००० इतकी आहे. संस्था अतिशय भक्कम आर्थिक पायावर उभी असून भविष्यात संस्थेच्या विस्ताराविषयी संचालक मंडळाने चांगली योजना आखली आहे. संस्था RTGS / NEFT/QR CODE/IMPS सारखे तंत्रज्ञान वापरात महाराष्ट्रात अग्रेसर असून त्यामुळे आम्हाला समाधानी ग्राहक वर्ग लाभल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदुम. डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम हे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.