मिरज : शहरातील रॉकेल डेपो झोपडपट्टी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन अल्पवयीन बालकांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६७ हजार पाचशे रुपयांचा दोन किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. मिरजेतील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे गांजा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. यावेळी तिघेही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.