Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत! नेमकं प्रकरण काय?

धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत! नेमकं प्रकरण काय?
 

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींशी असलेल्या संबंधावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मस्साजोग प्रकरणानंतर बीडमधील गुंडगिरी, त्याची दहशत आणि त्यांना आश्रय देणारे राजकीय नेते यांची जोरदार चर्चा सुरू झाली. आरोपींशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका तरुणाला मारहाण करत असलेल्या खिंडकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर दादासाहेब खिंडकरांनी सरेंडर केले. बीडमधील राजकीय नेत्याचे पाठबळ आहे का, याची चर्चा सुरू झाली.
दादासाहेब खिंडकर हा राष्ट्रवादीचा स्थानिक नेता असून तोदेखील सरपंच आहे. दादा खिंडकरावरही अनेक आरोप असून काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. दादासाहेब खिंडकर याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला केला होता. त्याशिवाय, त्यांच्या कारची तोडफोड केली होती. या प्रकरणात दादा खिंडकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
 
खिंडकरांचा आका, राष्ट्रवादीचा नेता?
परमेश्वर सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा आरोप केला. दादा खिंडकरचे आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित आहेत. त्यांनी चार गुन्हे दाखल करू दिले नसल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावर दादा खिंडकर याने आतापर्यंत दादागिरी केली. दादा खिंडकर याचा तडीपाडीचा प्रस्ताव त्यांनीच रोखला होता, असा गौप्यस्फोट सातपुतेंनी केला. अमरसिंह पंडित यांनी त्याला थोडं बाजूला केल आहे. अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला नसता तर दादा खिंडकर जेल मध्ये असता. दादा खिंडकर याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला राजकीय नेत्यांनी कॉल केले असल्याचा आरोप सातपुते यांनी केला. खिंडकर प्रकरणात थेट अमरसिंह पंडित यांचे नाव आल्याने राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या या आरोपानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.