बीड: बीडमधील पोलीसांनी अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलंय. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत अनेक पुरावे उपलब्ध असून ते सर्व घेऊन बीडला जाणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी दिली आहे.
तसेच जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांना बीडच्या बाहेर काढा अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, बीड जिल्ह्याचा गुंडाराज रोखायचा असेल तर या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बीड बाहेर घालवण्याची वेळ आली आहे. वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी जाहीर केली होती. याबाबत गृहमंत्रालय आणि पोलीस अधीक्षक बीड यांना देखील तक्रार दिली होती . जे आरोप मी केले होते, त्या संदर्भातले पुरावे घेऊन येण्यासाठी मला बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी आणि या सगळ्या बाबतीतचे पुरावे घेऊन मी 17 मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर काढा : तृप्ती देसाई
बीडमध्ये वाल्मीक कराडच्या मर्जीनुसार अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षी काम करतात. अनेक गुन्हेगारांना त्यांनी पाठीशी घातल आहे . माझ्याकडे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अनेक पुरावे ऑडिओ ,व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध आहेत हे सर्व घेऊन मी बीडला जाणार आहे. गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे तुम्हाला जे पुरावे हवे आहेत ते पुरावे देते पण जे दोषी आहेत त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर काढा, जे दोषी आहेत त्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे.
बीड पोलिसांची नोटीस
वाल्मिक कराड प्रकरणात तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर आरोप केले होते . बीड येथे कार्यरत असलेल्या आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याचा दावा करत पोलिस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली होती. सोशल मीडियावर या 26 पोलिस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय, डीवायएसपी, अतिरीक्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संदर्भातच तृप्ती देसाईंना नोटीस पाठवण्यात आली आहे. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर रहा असे म्हणत बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना पुण्यात नोटीस पाठवली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.