बीड: प्रयागराजमधून अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला आज बीडमध्ये आणले जात आहे. तर, दुसरीकडे खोक्याचे घर काही अज्ञातांनी जाळले असल्याचीा घटना समोर आली आहे.
या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. गुंडगिरी, मारहाण, प्राण्यांची शिकार करणे आदी विविध गुन्हे खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी खोक्याने प्रयागराजला पलायन केले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी प्रयागराजमध्ये खोक्याच्या मुसक्या आवळल्या. तर, दुसरीकडे गुरुवारी वनविभागाने खोक्याचे घर पाडले. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरूनही कारवाई करण्यात आली.
वन विभागाने पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराची अज्ञाताने आग लावली. वन विभागाने हे घर अतिक्रमित ठरवलं होतं. त्यानंतर पाडकाम करण्यात आले. अतिक्रमणात पाडलेल्या घराला अज्ञाताने आग लावून दिली. यावेळी कुटुंबीयांना मारहाण झाली असल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. जाळपोळीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.बीडमध्ये खोक्याने वनविभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधलं होतं. वनविभागाने जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती. पण आपल्यावर राजकीय हात असल्यामुळे या खोक्याने नोटीसीकडे दुर्लक्ष केलं होतं. वारंवार नोटीस पाठवूनही या खोक्याने नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर होतं. वनविभागाच्या जागेवर त्याचे घर होते. त्याच घरावर बुलडोझर चालवून वन विभागाने खोक्याला दणका दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या टीम तैनात होत्या. घरावर बुलडोझर चालवण्याआधी पोलिसांनी खोक्याचं घरातलं साहित्य बाहेर काढलं. यावेळी एखाद्या बंगल्यातही असं घरउपयोगी साहित्य नसेल असं साहित्य समोर आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.