Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विरार :-धक्कादायक! सुटकेसमध्ये आढळलं महिलेचं मुंडकं, अवयवांचा पत्ता नाही; परिसरात खळबळ

विरार :- धक्कादायक! सुटकेसमध्ये आढळलं महिलेचं मुंडकं, अवयवांचा पत्ता नाही; परिसरात खळबळ
 

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी एका महिलेचं मुंडकं सुटकेसमधून मिळालं आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या याची सखोल चौकशी सुरू आहे. महिलेची अशाप्रकारे निघृण हत्या केल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. सुटकेसमध्ये फक्त महिलेचं मुंडकं सापडले आहे. त्यातूनही तिचे इतर अवयव हे गायब आहेत. त्यातून हे अवयव येथे कुठे आसपास असल्याची शक्यता आहे, असं पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातून नक्की हा प्रकार कुणी केला याचीही शोध सुरू आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ एका पिशवीत महिलेचं मुंडकं आढळल्याने खळबळ उडाली. आसपासच्या नागरिकांना एकच धक्का बसला. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. काही तरूण शिरवली येथील पीर दर्ग्याजवळच्या आडोशाला लघुशंकेसाठी गेले होते. तेथे या तरूणांना एक बॅग दिसली. त्या पिशवीमध्ये महिलेचं मुंडकं होतं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.

मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक रिकामी सुटकेस देखील आढळून आली. त्यात काही वस्तू होत्या. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहाचे अन्य तुकडे याच परिसरात टाकले असण्याची शक्यता आहे. यावेळी महिलेची ओळख पटविण्याचेही काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. आता मुख्य आरोपी नक्की कोण आहे, याचाही पोलिस तपास घेत आहेत. सध्या अनेक भागात असे गुन्हे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचेही वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.