बारामती: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा एकीकडे सुरु असतानाच दुसरीकडे शुक्रवारी (दि. १४) अचानक त्यांनी बारामतीत येत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु पवार यांच्यासोबत त्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगांची पाहणी केली. खा. सुप्रिया सुळे या ही त्यांच्यासोबत होत्या. जयंत पाटील हे पक्षात नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीतील शुक्रवारची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
पाटील यांच्या दौर्याबाबत खा. सुळे म्हणाल्या, किती भाग्य आहे बघा..! की सर्वांनाच असं वाटतं की..! ही व्यक्ती आपल्याकडे हवी..! असे प्रत्येकाला वाटणे हे केवढी मोठी बाब आहे. पाटील हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यावर सुळे म्हणाल्या, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है.'
जय पवार यांच्या विवाह बंधनाचा आनंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या विवाह बंधनाचे काही फोटो खा. सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवर टाकले. त्याबाबत त्या म्हणाल्या, जय पवार यांचे लग्न ठरतेय याचा आम्हाला आनंद आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी आले होते,असेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.