बीड : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. 27 मार्चला द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यूबाबत वेगळे तर्क वितर्क
लावण्यात आले. हा मृतदेह त्याच महिलेचा असल्याची चर्चा आहे. तसेच ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील महिलेची हत्या झाल्याची
शंका व्यक्त केली आहे.
मनिषा बिडवे, मनिषा आकुसकर, मनिषा बियाणी, मनिषा गोंदवले या नावाने ती महिला वावरत होती. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. विविध नावने प्रसिद्ध असलेली ही महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात हत्या झाल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे
मृत महिलेची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी झाली होती, अशी देखील चर्चा आता समोर येऊ लागली आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. 5 ते 6 दिवसांपासून संबंधित महिलेचं मृतदेह घरात पडून होतं, शेजाऱ्यांना वास आल्याने सर्व प्रकार समोर आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत मागील काही वर्षांपासून मनीषा कारभारी-बिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला राहत होती. ती एकटीच राहत होती. बुधवारी वसाहतीतील लोकांना वास येऊ लागला. कोणीतरी प्राणी मृत झाला असेल या विचाराने शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्षित केले. मात्र गुरुवारी मृत महिलेच्या घराकडून हा वास अधिक तीव्र झाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला असता,डोक्याला मार लागलेला आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी देखील करत असल्याची देखील माहिती मिळतेय. काही लोकांचा तिच्या घरी येणंजाणं होतं. रात्री अपरात्री कधीही कोणी तिच्या घरी येत असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. पोलिसांनी चौकशी साठी संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.