Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठी गळती, मिरज पूर्व भागातील मोठा मासा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला

सांगली जिल्ह्यात  काँग्रेस पक्षाला मोठी गळती, मिरज पूर्व भागातील  मोठा मासा  जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला 


बेडग गावातील अमर पाटील सह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात  प्रवेश , 

मिरज पूर्व भागात  काँग्रेस पक्षाला  मोठी गळती सुरू झाली असून मिरज पूर्व भागातील काँग्रेस पक्षाचा अमर पाटील यांचा गट आज  जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला लागला आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे   प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली  आहे.सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या  विजया मध्ये मोलाचा वाटा असणारे    काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

 आज प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अमर दादा पाटील  यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात  जाहीर प्रवेश केला  समित दादा कदम यांची सांगली जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी सुरू असून त्यांच्या कडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आज  बेडग गट प्रमुख  अमरसिंह पाटील
 

ग्रामपंचायत सदस्य कैलास दादा पाटील, जनसेवा पतसंस्थाचे चेअरमन 
शहाजी तात्या पाटील  ,बाळासाहेब उर्फ दत्तात्रय पाटील  सह्याद्री पतसंस्था संस्थापक एन जी पाटील ,अनिल ओळागड्डे 
बी डी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी  प्रवेश केल्यानंतर  समित दादा कदम यांनी शुभेच्छा देऊन  येणाऱ्या काळात बेडग गावाच्या  विकासाला सर्व मदत करण्याचे अभिवचन देण्यात आले यावेळी   ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव  अण्णा करणे   डॉ पंकज म्हेत्रे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण  जयसिंग चव्हाण अरविंद पाटील विनायक शेरबंदे शुभम वाघमारे  यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.