बेळगाव येथील आधार सोशल फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम; आदाटे खर्या सामाजिक कार्यकर्त्या : अॅड. हट्टीमनी
सांगली : आधार सोशल फौंडेशन, बेळगाव या संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्रसिद्ध व्याख्याते आणि शिक्षक बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांच्याहस्ते राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अॅवार्ड 2025 चा आदर्श समाज भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे, साहित्यिक डॉ. प्रकाश कदम, सचिव अॅड. प्रिती हट्टीमनी उपस्थित होते. अॅड. हट्टीमनी म्हणाल्या, ज्योती आदाटे यांनी गेल्या 35 वर्षापासून सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. एसएफआय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढत राहिल्या. मोर्चे, धरणे, उपोषण, जेलभरो अशी विविध आंदोलने करून प्रश्न मार्गी लावले. त्या कॉलेजमध्ये असतानाच राजकारणात सक्रिय झाल्या.
कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच सांगली नगर परिषदेत निवडून आल्या. त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक नगरसेविका म्हणून मान मिळवला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रभाग सभापती पद बहाल केले स्थायी समितीवर सदस्य म्हणून ही त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली. या काळात त्यांनी प्रचंड काम केले तळागाळातील लोकांपर्यंत मेळावे घेऊन या योजनेचा लाभ दिला. अगदी वेश्यावस्तीत सुद्धा या समितीला न्यायचे काम यांनी केले.या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा म्हणून ही कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या टीम सोबत जिवावर उदार होऊन अनेक भोंदू बुवाचा पर्दाफाश केला आहे. अनेक शाळा कॉलेज खेडोपाडी शहरातील कित्येक भागात चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहीत प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतात. कोरोना च्या काळात जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना मदत केली आहे. त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव म्हणून त्यांची निवड झाली असुन या चळवळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. त्या आकार फौंडेशनच्या ट्रष्टी देखील आहेत. विषेश म्हणजे त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक नाटक व चित्रपटात विविध भुमिका करून या सांस्कृतीक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. यावेळी अंनिसची संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.