पंतप्रधान मोदींसमोर नितीन गडकरींना भाषणच करू दिले नाही? एका व्यासपीठावर असूनही....
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे त्यांचे प्रत्येक राजकीय पक्षाशी चांगले संबंधही आहेत. त्यांनी अनेकदा सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीकाही केली आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यावर देशात चर्चा झाली आहे.
२०२४च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यामुळे ते अडचणीतही सापडले होते. त्यांचा मंत्रीपदाचा मार्ग काटेरी राहिला का? अशीही चर्चा रंगली होती. रविवारी नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा दौरा झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका व्यासपीठावर आले होते. परंतु, एका व्यासपीठावर असूनही या दोघांमध्ये कुठलाही संवाद होताना दिसला नाही. तर गडकरींना कार्यक्रमादरम्यान भाषणही करू दिले नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधान आले आहे.
सरसंघचालक आणि फडणवीसांचे भाषण झाले
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भाषणे झाली. फडणवीसांंनी किमान पाच मिनीट भाषण केले. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते. तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालकात रंगल्या गप्पा
जवळपास अकरा वर्षांपासून नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. त्यामुळे दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असतील अशीच चर्चा सर्वत्र असते. परंतु, रविवारी कार्यक्रमादरम्यान मोदी आणि गडकरी यांच्यात कुठलाही संवाद होताना दिसला नाही. याउलट पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मोदींच्या भाषणानंतरही दोघांमध्ये काही काळ हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. परंतु, गडकरी आणि मोदींमध्ये दुरावा आहे का? कुलबूज नागरिकांमध्येही होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.