Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी
 

सांगली, दि. 13 : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे मार्च 2025 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास बुधवले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामूहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज  स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. बुधवले यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.