Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग, थेट सिनेइंडस्ट्रीसोबतचं कनेक्शन उघड

वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग, थेट सिनेइंडस्ट्रीसोबतचं कनेक्शन उघड


बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला आरोपी वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वाल्मिक कराड याचे थेट सिने इंडस्ट्रीसोबत कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.

वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर आरोपांच्या फैऱ्या झडू लागल्या. वाल्मिक कराडचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि इतरांना अटक केल्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर येऊ लागले. यामध्ये खंडणी आणि इतरही प्रकरणे समोर आली. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीची चांगलीच चर्चा झाली.

वाल्मिक कराडचा नवा उद्योग...

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वाल्मिक कराड हा चित्रपट निर्माता असल्याचे असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याचा आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोडूसर असोसिएशन या सिने निर्मात्या संघटनेचे ओळखपत्र समोर आले आहे. वाल्मि कराड हा आजीवन सभासद असून बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था असल्याचे समोर आले आहे.

वाल्मिक कराड यांच्या बीकेसी मधील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसच्या फोटो देखील समोर आले आहेत. हे वाल्मिक कराडचे ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.