सांगली, दि. 13 : राज्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1 हजार 673 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
या निवडणुकांकरिता पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 19 मार्च 2025. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार, 19 मार्च 2025 ते सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 26 मार्च 2025 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.