बीड हादरलं! जिथं भावानं जीव दिला, त्याच झाडाखाली संशयिताला ठेचलं, दगडाने केला चेंदामेंदा
बीड: बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका आत्महत्येचा बदला म्हणून ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे.
आरोपीच्या भावाने ज्या झाडाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली घेऊन जात या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर संतोष देशमुख असं आरोपीचं नाव आहे. दोघंही बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्याती कान्नापूर याठिकाणी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील कन्नापूर येथे दोन वर्षांपूर्वी किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी एका लिंबाच्या झाडाला गळफास लावू आत्महत्या केली होती. ही आत्महत्या मयत स्वप्निल देशमुखच्या मानसिक छळाला कंटाळून केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत स्वप्नील हा अविनाश देशमुख यांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. अविनाश देशमुख यांचा भाऊ संतोष देशमुख याने गुन्हा मागे घ्यावा, असा दबाव स्वप्नील देशमुख टाकत होता. यातून आरोपी संतोष देशमुख आणि मयत स्वप्नील देशमुख यांच्यात वाद झाला. आधी भावाच्या आत्महत्येसाठी जबाबदार आणि त्यानंतर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव यातून संतोष देशमुखांनी बबलू उर्फ स्वप्नील देशमुखच्या हत्येचा कट रचला आणि संतोषनं स्वप्नीलची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. आरोपी अक्षरश: स्वप्नीलच्या डोक्याचा चेंदामेंदा केला.
विशेष म्हणजे अविनाश देशमुख यांनी ज्या लिंबाच्या झाडाखाली आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली स्वप्नीलची हत्या करण्यात आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हत्येनंतर संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.